Tuesday, June 11, 2013

५१ रॉकफेलरचा दंभ उतरला.

                      कथा विवेकानंद - ५१

     धनाढ्य माणसे तशी सणकी असतात . अमेरिकेत श्री . जॉन रॉकफेलर नावाचे एक कोट्याधीश होते . त्यांना कोणीतरी स्वामीजींची माहिती सांगितली . स्वामीजींना भेटण्याचा सल्ला दिला . पण संपत्तीचा थोडासा गर्व असलेल्या रॉकफेलरननी तो सल्ला टाळला . ना धर्माचा ना श्रीमंतही ! कशाला जायचे ?
     का पण कोण जाणे ! एक दिवशी सणक मारली . त्यांनी स्वामीजींचे निवासस्थान गाठले . गाडीतून उतरले आणि ताडताड पावले टाकीत दरवाज्या समोर आले . दरवाज्यासमोर रक्षक उभा . त्या रक्षकाला धडक देत त्यांनी स्वामीजींच्या खोलीत प्रवेश केला . 
     स्वामीजी पुस्तक वाचत बसले होते . ' या बसा नमस्कार ' म्हणायचे सोडाच स्वामीजींनी बघितले सुद्धा नाही . बेचैन होऊन रॉकफेलर फेऱ्या मारू लागले . काही वेळाने न राहवून ते स्वामीजवळ गेले . 
     ' आलेल्या माणसाचे शब्दाने सुद्धा स्वागत करायचे नाही हि कुठली रीत ? ' रॉकफेलर उद्गारले . 
     ' जिथे खोलीत प्रवेश करताना अनुमती न घेता प्रवेश करत असतात तिथली . ' स्वामीजी म्हणाले . 
     ' आणि बसायला न द्यायचे कारण ? ' रॉकफेलर . 
     ' रक्षकाला ढकलायचे कारण ? ' स्वामीजी . 
     रॉकफेलरचा दंभ उतरला होता . 

No comments:

Post a Comment