Wednesday, June 12, 2013

५२ . धन्यवाद, तुम्ही मला द्यायचे !

                         कथा विवेकानंद - ५२


     अमेरिकेत श्री . जॉन रॉकफेलर नावाचे एक कोट्याधीश होते . त्यांना संपत्तीचा फार गर्व . कोणीतरी स्वामीजींची माहिती सांगितली . आणि ते स्वामीजींना भेटायला गेले . 
     स्वामीजीं काही क्षण त्यांना एकटक बघितले . रॉकफेलरच्या जीवनातील केवळ त्यांनाच ठाऊक असलेल्या काही गोष्टी स्वामीजी सांगू लागले . रॉकफेलरनी आ वासला होता . 
      ' तुमच्याकडे जो पैसा आहे तो वास्तविक तुमचा नाही . तुम्ही त्याचे विश्वस्थ आहात . समाजाच्या सहकार्याने तो तुम्ही मिळविलाय . समाजासाठी दान करा त्याचे . देवानेच हि संधी दिलीय तुम्हाला . ' स्वामीजी उद्गारले . 
     सुरुवातीला जमिनीवर उतरविले, मघाशी खाली बसविले आणि आता अक्षरशः उचलून बाहेर फेकून दिले ! गर्वाचे गाठोडे ! अवाक होऊन निघून गेले रॉकफेलर . 
     काही दिवसांनी हे वादळ पुन्हा आले . अनेक सामाजिक योजनाची धारिका घेऊन आले होते ते . ' बघा किती दानधर्म मी करणार आहे तो . आता मात्र आभार मानायलाच हवे तुम्ही माझे ! ' रॉकफेलर म्हणाले . 
     स्वामींनी कागद चाळले . ते रॉकफेलरना म्हणाले , ' अहं , मी नव्हे ! धन्यवाद, तुम्ही मला द्यायचे ! हि संधी दिली म्हणून ! ' 
     आज रॉकफेलर प्रतिष्ठान दानधर्म करणारे अमेरिकेतील श्रेष्ठ प्रतिष्ठान आहे . 

No comments:

Post a Comment