कथा विवेकानंद - ५८
स्वामी विवेकानंदांनी एका युवकाला संन्यासदीक्षा दिली . त्याचे नाव ठेवले कल्याणानंद . समारंभ पार पडल्यावर स्वामीजींनी विचारले, ' तू आता माझा शिष्य झालास . मी गुरु . बोल, गुरुदक्षिणा काय देणार ? '
शिष्यही ताकदीचा होता . तो म्हणाला, मीच मला तुम्हाला अर्पण केलेय . माझ्याकडून काय गुरुदक्षिणा पाहिजे ती सांगा . तुम्ही सांगाल ते ऐकेन . '
स्वामीजी म्हणाले , ' तर मग लवकरच तू इथून निघायचे . मी थोडे पैसे देईन . ते घेऊन हरिद्वार गाठायचे . तेथे एक झोपडी बांधायची . आणि तिथे रहायचे . पुन्हा इकडे यायचे नाही . '
स्वामीजी पुढे म्हणाले, " हरिद्वार हे आमचे धर्मस्थान . रोज हजारो भविक तेथे जातात . प्रवासाच्या दगदगीत ते आजारी पडतात . कोणाच्याही आश्रयाला, रस्त्यावर ते पडलेले दिसतात . योग्य उपचार न झाल्यामुळे त्यातील अनेकजण दगावतात . या असहाय्य भाविकांची सेवा कर . त्याच्यावर औषधोपचार कर . त्यांना आपले मानून पूर्ण काळजी घे . हेच तुझे भावी कार्य . मला विसरून जा . "
हरिद्वारला गेलेल्या कल्याणानंदांची आणि विवेकानंदांची हि शेवटची भेट !

No comments:
Post a Comment