कथा विवेकानंद - ६५
कार्याचा सन्मान झालाच पाहिजे .
बोलता बोलता स्वामीजी एका सामाजिक कार्यकर्त्याची प्रसंशा करू लागले . त्याने उभे केलेले काम, त्यासाठी केलेले कष्ट, त्या कामामागचा त्याचा विचार ते सांगू लागले . त्या कामातून झालेल्या सामाजिक बदलावरही त्यांनी भाष्य केले .
तेथे असलेल्या एका गृहस्थाला ते आवडले नाही . आपली नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला, ' स्वामीजी, पण तो माणूस तर तुम्हाला अजिबात मानीत नाही . '
स्वामीजी म्हणाले, ' अरे असे कसे ? त्याने मला मानले म्हणजे त्याचे काम श्रेष्ठ असे कुठे आहे ? तो श्रेष्ठ आहे, तो त्याने चांगले कार्य केले म्हणून ! त्यासाठी मी त्याची प्रसंशा केली . '
चांगले काम मग ते कोणीही का करेना, त्यामुळे देशाची उन्नती होते, आध्यात्मिक प्रगती होत असते . त्या कार्याचा सन्मान झालाच पाहिजे .

No comments:
Post a Comment