Sunday, June 30, 2013

६६ .कोणाही बरोबर मी जेऊ शकतो .

                     कथा विवेकानंद - ६६ 

     स्वामी विवेकानंदावर खेत्री संस्थानाच्या महाराजांची खूप श्रद्धा होती .  श्री . जगमोहनलाल त्यावेळी संस्थानाचे दिवाण होते . स्वामीजी संस्थानात आले की, स्वामीजी, महाराज आणि जगमोहनलालजी यांच्यात विविध विषयांवर चर्चा होत.ऐकणाऱ्याना ती एक बौद्धिक मेजवानीच असे . 
     असेच एकदा स्वामीजी संस्थानात आले होते . बोलता बोलता जगमोहनलाल म्हणाले, ' स्वामीजी तुम्ही असे कसे ? स्वतःला तुम्ही हिंदू संन्यासी म्हणवून घेता, आणि मुसलमानाकडे भोजन करता ? म्लेंच्छांचा हात लागला तर तुम्ही हिंदू कसे राहणार ?
     स्वामीजींना राग आला . ते तीव्र शब्दात म्हणाले, " मी संन्याशी आहे . ' करतल भिक्षा तरुतल वास ' अशी आमची पद्धती . मला कसले लागतात तुमच्या रूढी आणि रीतीरिवाज . ज्ञानदान करणारा शिक्षक व संडास साफ करणारा भंगी मला सारखेच . कोणाही बरोबर मी जेऊ शकतो . "


No comments:

Post a Comment