Thursday, June 13, 2013

५३ .तू ब्रह्म नाहीस ! विवेकानंद आहेस !

                           कथा विवेकानंद - ५३ 

     अमेरिकेत प्रसिद्धी मिळाल्यावर स्वामीजींना अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी निमंत्रणे येऊ लागली . एका महिला मंडळात स्वामीजींचे भाषण होते . भाषण सुरु व्हायला थोडा वेळ होता . सभागाराशेजारील खोलीत स्वामीजींची बसण्याची व्यवस्था केली गेली . 
     कार्यक्रमाची वेळ झाली . आयोजिका खोलीत आल्या . विवेकानंद डोळे मिटून शांतपणे बसले होते . त्यांनी स्वामींना चलण्याची विनंती केली . स्वामीजी एकदम दचकल्या सारखे उठले. डोळे पुसले आणि दाराकडे जाऊ लागले . 
     एकदम मागे वळले . आरशापुढे जाऊन उभे राहिले . आपला फेटा त्यांनी नीट  केला . आरशात स्वतःला बघितले आणि चालायला लागले . दाराजवळ जाताच पुन्हा मागे वळले . पुन्हा आरशाजवळ गेले .  
आयोजिका हसल्या . म्हणाल्या, ' आज स्त्रियांसमोर व्याख्यान आहे म्हणून काय ? '  
     स्वामीजी हसले, ' अहं ! तसं काही नाही . तुम्ही मला वेळ आहे म्हणालात . मी बसलो आणि समाधी अवस्थेत गेलो . हाक मारल्या बरोबर जागा झालो .  पूर्ण भानावर येण्यासाठी मनाला बजावीत होतो कि, तू ब्रह्म नाहीस ! विवेकानंद आहेस ! तू ब्रह्म नाहीस ! विवेकानंद आहेस ! ' 

No comments:

Post a Comment