कथा विवेकानंद - ६२
स्वामी विवेकानंद आध्यात्मिक पुरुष . त्यात योद्धा संन्याशी . साहजिकच अनेक तरुण त्यांना भेटण्यास, त्यांचे मार्गदर्शन घेण्यास येत . पण त्यांचा सेवाभावाचा पैलू अनेकांच्या लक्षात येत नसे .
असाच एक तरुण त्यांच्याकडे आला . अनेक ग्रंथांचे वाचन केलेला, विविध साधना केलेला असा . तो स्वामीजींना म्हणाला, ' स्वामीजी मी अनेक साधना केल्या . दारे बंद करून स्वतःला कोंडून घेतले . तासनतास बसलो पण शान्तिलाभ काही होत नाही . माझे काय चुकतेय ? मी काय करावे ?
स्वामीजी हसले आणि म्हणाले, ' बेटा, दारे बंद नाही, दारे उघडी कर . उठ, खोलीतून बाहेर पड . आजूबाजूला बघ . अनेक गोरगरीब तुला दिसतील, त्यांच्यासाठी धान्य गोळा कर . अनेक आजारी रुग्ण असतील, त्यांना औषधोपचार कर . खुपजण अशिक्षित भेटतील, त्यांना साक्षर कर . जनताजनार्दन म्हणतात . समाज हाच देव आहे . त्याची सेवा कर . तुला मनःशांती अवश्य लाभेल . '

No comments:
Post a Comment