कथा विवेकानंद - ५६
स्वामी विवेकानंद प्रवासात एका यजमानांच्या घरी उतरले होते . फिरायला गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला एक माणूस झोपलेला दिसला . वेदनांनी तो कण्हत होता . स्वामीजींनी जवळ जाऊन बघितले . तो माणूस आजारी होता . अतिसाराने त्याची दशा झाली होती . तो चालूही शकत नव्हता .
स्वामीजींनी त्याची सुश्रुषा करायचे ठरविले . पण त्याला नेणार कोठे ? यजमानाच्या घरी नेले, आणि त्यांना वाईट वाटले तर ! थोडा विचार केला आणि स्वामीजी त्याला घेऊन यजमानाच्या घरी आले . जेथे स्वामीजी स्वतः उतरले होते .
स्वामीजींनी त्याची योग्य ती सेवा सुश्रुषा केली . तो बरा झाला . यजमानांनाही खूप बरे वाटले . स्वमिजीच्या सेवाभावनेने सगळे प्रसन्नचित्त झाले .

No comments:
Post a Comment