कथा विवेकानंद - ५४
स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले . आपल्या चिरंतन भाषणाने त्यांनी विश्वदिग्विजय केला . काही वर्षे युरोपीय देशात हिंदू धर्माचा प्रसार केला . हिंदू तत्ज्ञानाची कीर्ती दशदिशा फाकविली. आणि ते परतीच्या प्रवासाला लागले .
स्वामी विवेकानंदांचे भारतात आगमन झाले . आणि अभूतपूर्व स्वागताने हिंदू जनमानस रोमांचित झाले .जिकडे तिकडे स्वामीजींच्या प्रकट सत्काराचे प्रचंड कार्यक्रम होऊ लागले .
स्वामीजी पंबनला आले . पंबनच्या राजवाड्यात त्यांचा मुक्काम होणार होता . राजधानीच्या वेशीवर लोकांचा प्रचंड जमाव जमला होता . विवेकानंदांचे आगमन झाले . स्वामीजींच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून जाऊ लागले .
वेशीवरून मिरवणूक सुरु झाली . महाराज रथात बसले होते . महाराजांनी रथ थांबविला . ते पायउतार झाले . स्वामीजींचा रथ ते ओढू लागले . स्वतः रथ ओढत ओढत त्यांनी स्वामीजींना राजवाड्यात आणले .

No comments:
Post a Comment