Wednesday, June 26, 2013

६१ .दणदणीत गुण पडतील .

                   कथा विवेकानंद - ६१ 

     स्वामी विवेकानंद तेव्हा विद्यार्थी होते . परीक्षेचे दिवस होते . पहाटे उठून सगळे विद्यार्थी अभ्यासाला बसत . दोनेक तास, अभ्यास उजळणी करून परीक्षेला जात . 
     असाच एक दिवस होता . नरेंद्र पहाटे उठला आणि गायला लागला . आपल्या दमदार आवाजात त्याने गीते म्हणायला सुरुवात केली . त्याचे सगळे साठी जमले . त्या सुमधुर गायनाचा आस्वाद घेऊ लागले . गीतामागून गीते नरेंद्र गात होता . अगदी तन्मय होऊन, जगाचे भान विसरून . 
     दोनेक तासानी एक मित्र भानावर आला . परीक्षेची आठवण होऊन तो नरेंद्राला म्हणाला, ' अरे, परीक्षेची आठवण आहे का ? '
     " आहे तर ! म्हणूनच हि साधना चालली आहे . " नरेंद्र म्हणाला . "  मेंदूची साफसफाई ! नव्या गोष्टी घाईघाईने कोंबत गेलो तर आहे ते आणि नवे यांचा गोंधळ व्हायचा . यापेक्षा शरीर आणि मन शांत, आनंदी ठेवले म्हणजे मागचा अभ्यास आठवेल . भरभर लिहिता येईल आणि दणदणीत गुण पडतील . " 

  

No comments:

Post a Comment