Tuesday, June 25, 2013

६० . हा मुलगा पुढे फर्डा वक्ता होईल .

                         कथा विवेकानंद - ६० 

     बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात . त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते . इंग्रजी स्वभावानुसार शाळेत इंग्रजी भाषा सक्तीची होती . एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर बिलेले घोषणा केली की, ' ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनविले, त्या इंग्रजांची भाषा मी मुळीच शिकणार नाही .' वडील प्रख्यात वकील आणि आईही धार्मिक प्रवृत्तीची ! दोघांनीही मार्ग काढला . बिले शिकायला लागला . 
     मेट्रोपोलीटन इन्स्टिट्युट मध्ये नरेंद्रनाथ शिकत होता . शाळेत प्रमुख समारंभ होता . प्रमुख पाहुणे होते बंगालातील मोठे नेते श्री . सुरेंद्रनाथ बेनर्जी . समारंभात विद्यार्थ्यांमधून कोण भाषण करणार ? शिक्षकांमध्ये चलबिचल चालली . 
     शेवटी नरेंद्राची निवड करण्यात आली . कार्यक्रमातील त्याचे भाषण अतिशय उत्कृष्ट झाले . सुरेंद्रनाथ बेनर्जी तर एकचित्ताने ऐकत होते . कार्यक्रम झाल्यावर त्यांनी नरेंद्राला जवळ बोलाविले . त्याच्या पाठीवरून हात फिरविला . ते म्हणाले, ' अभिनंदन ! छान बोललास . असाच बोलत राहा. ' शिक्षकांशी बोलताना ते म्हणाले. ' हा मुलगा पुढे फर्डा वक्ता होईल . ' 

No comments:

Post a Comment