Wednesday, June 26, 2013

६४ . तुझ्या भाषेत ईश्वराची आराधना कर .

                       कथा विवेकानंद - ६४ 
                तुझ्या भाषेत ईश्वराची आराधना कर .

     स्वामीजी प्रवासात अनेक जणांच्या घरी मुक्काम करीत . मुक्कामात लोक त्यांना प्रश्न विचारीत . आपल्या शंकांचे निरसन करून घेत . 
     अशाच एका मुक्कामी नटकृष्णानी स्वामीजींसमोर आपली समस्या ठेवली . ते स्वामीजींना म्हणाले, ' मनाला समाधान मिळावे म्हणून गेले कित्येक महिने मी संध्या व गायत्री जप नियमित करीत आहे . पण म्हणावे तसे समाधान मिळत नाही . काय होते काही कळत नाही . '
     स्वामीजी म्हणाले, ' नटकृष्ण, नुसते घोकून किंवा पाठ करून काहीही मिळत नाही . जे काय मिळवायचंय ते आपल्याला स्पष्ट पाहिजे . जी भाषा आपल्याला कळत नाही त्या भाषेतून प्रार्थना करून काही उपयोग नाही . तू तुझ्या भाषेत ईश्वराची आराधना कर . तुला ईश्वर निश्चित प्राप्त होईल . '  

No comments:

Post a Comment