कथा विवेकानंद - ५०
एकदा स्वामीजी बोलत होते . आपल्या शिष्याला वेदांताचे स्वरूप विशद करून सांगत होते . स्वामी रामकृष्णाचे शिष्य श्री . गिरीशचंद्र घोष तेथे आले . स्वामीजींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले . बराच वेळ झाला आणि स्वामीजी थांबले .
थोडा वेळ शांततेत गेला . श्री . गिरीशचंद्र घोष बोलायला लागले, ' स्वामीजी, तुम्ही वेदांताचे जाणकार आहात . आजची आपल्या समाजाची परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे . गरिबी, रोगराई, अज्ञान, अशिक्षा, पारतंत्र्य ! '
श्री . गिरीशचंद्र घोष पुढे म्हणाले ,' स्वामीजी यातून सुटण्याचा काही मार्ग वेदांतात आहे काय ? '
श्री . गिरीशचंद्र घोष तत्कालीन भारतीय स्थितीचे वर्णन करीत होते . आणि स्वामीजींच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते . सहन होईनासे झाले आणि स्वामीजी उठून दुसऱ्या खोलीत निघून गेले .
श्री . गिरीशचंद्र घोष उपस्थितांना म्हणाले, ' बघितले का ! केवढ्या विशाल हृदयाचे स्वामीजी तुम्हाला मिळाले आहेत ते . '

No comments:
Post a Comment