कथा विवेकानंद
हिंदू हा सत्य सनातन धर्म. या धर्माची पालखी वहाण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी वेळोवेळी केले. आपल्या प्रतिभेने तत्कालीन परिस्थितीवर मात करीत भारतीय संस्कृतीचा हा प्रवाह अक्षुण्ण ठेवला. स्वामी विवेकानंद हे त्या मांदियाळीतील शीर्ष नाव.
स्वामी विवेकानंद हे नाव ऐकले नाही असे म्हणणारा माणूस भेटणे तसे विरळच ! भारतीय समाज मानसाला जागृत करण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले. आपल्या शरीराचा कणन कण झिजविला. देशाचा विचार करणाऱ्या लोकांना प्रेरणा दिली. भारतातील सर्व क्षेत्रांना आपल्या परिस स्पर्शाने त्यांनी सोनेरी करून सोडले.
या महामानवाचे यंदा दीडशेवे जन्मसंवत्सर ! उद्या या संवत्सराचा शुभारंभ ! त्यांच्या लोकोत्तर कार्याला हि छोटीसी शब्दसुमनांजली !
. . . कौतुक बाळे

No comments:
Post a Comment