२. मी नाग बघितलाच नाही.
छोट्या नरेंद्रला ध्यानाचा खेळ खूप आवडे. मित्रांना घेऊन हा आवडता खेळ तो अनेकदा खेळे. अशीच एक दुपार. सगळे ध्यानाचा खेळ खेळू लागले.
सगळे डोळे मिटून बसले. थोड्या वेळाने कसला तरी आवाज आला. मुलेच ती. एकाने आपले डोळे हळूच उघडले. इकडे तिकडे पहिले. त्याचे लक्ष नरेन्द्र्कडे गेले आणि तो खाडकन उभा राहिला.
आपल्या मित्रांना जागे करीत तो भयभीत होऊन पाहू लागला. नरेंद्र ध्यानस्थ बसला आहे. आणि त्याच्या डोक्यावर फणा करून एक भलामोठा नाग डोलतो आहे.
मुले माता भुवनेश्वरीदेवींकडे पळाली. नागाची खबर सांगू लागली. आईलाही चिंता वाटली. ती धावत धावत आली. तोपर्यंतच्या आवाजाने तो भलामोठा नाग पसार झाला होता.
काही वेळाने नरेंद्राने डोळे उघडले. मुलांनी त्याला नागाची गोष्ट सांगितली. ते विचारू लागले. ' तुला नागाची भीती नाही वाटली. ' नरेंद्र म्हणाला, '' मला काहीच माहिती नाही. मी नाग बघितलाच नाही.''

No comments:
Post a Comment