Saturday, February 23, 2013

कथा विवेकानंद २०

                    २०.  माझे उत्तर बरोबर आहे !

     शाळेतील प्रसंग . शिक्षक विद्यार्थ्याना शिकवीत होते. शिकविता शिकविता  त्यांना प्रश्न विचारीत होते. 
     नरेंद्राला शिक्षकांनी प्रश्न विचारला . नरेंद्रने उत्तर दिले . शिक्षकाना ते उत्तर चूक वाटले . ते म्हणाले, ' चूक.'  नरेंद्र म्हणाला, ' बरोबर. '
     शिक्षकांना आला राग . त्यांनी नरेंद्रच्या हातावर एक छडी मारली . नरेंद्र पुन्हा म्हणाला, ' बरोबर ! ' शिक्षकांनी पुन्हा एक छडी मारली . 
     नरेंद्र बरोबर म्हणत होता . शिक्षक छडी मारत होते. 
     शिक्षकांना शंका आली . त्यांनी आपले उत्तर पडताळून पाहिले . शिक्षकांचे उत्तर चूक होते, नरेंद्रचे बरोबर होते .
     शिक्षक खजील झाले . मोठ्या मनाने त्यांनी आपली चूक मान्य केली . 

No comments:

Post a Comment