Sunday, February 17, 2013

कथा विवेकानंद १४

                १४. या विश्वाचा तू मोतद्दार बन !

     विश्वानाथबाबू  कोलकात्यातील प्रतिथयश वकील. त्यांचे उत्पन्नही भरपूर. त्या काळच्या पद्धतीनुसार त्यांच्याकडे घोडागाडी होती. ती चालवायला मोतद्दार होता. त्या मोताद्दराचा पोशाखही मोठा डौलदार होता. तो घालून मोतद्दार मोठ्या झोकात चालत असे. नरेन्द्रालाही आपण त्याच्यासारखे व्हावे असे वाटत असे.
     विश्वनाथबाबू  नुकतेच कार्यालयातून घरी आले होते. नरेंद्र दिवाणखान्यात खेळत होता. मुलांवर संस्कार करण्याच्या वयातच ते झाले पाहिजेत. यावर त्यांचा कटाक्ष असे.
     विश्वनाथबाबूंनी बाल नरेंद्राला विचारले, ' बेटा नॉरेन, तू मोठा झाल्यावर कोण होणार ? '
     खेळता खेळता नरेंद्रने उत्तर दिले, ' बाबा, मी ना मोठेपणी मोतद्दार होणार ! ' विश्वनाथबाबूंचे तोंड एकदम उतरले.
     भुवनेश्वरीदेवी बापलेकाचा हा संवाद ऐकत होत्या. नवऱ्याचा चेहरा पडलेला पाहताच त्या एकदम नोरेनला म्हणाल्या, " बेटा, तू जरूर मोतद्दार बन. ती  भिंतीवरची तस्वीर बघितलीस ना ! अर्जुनाच्या रथाचा तो मोतद्दार पाहिलास ना ! अगदी तसाच, या विश्वाचा तू मोतद्दार बन ! "

No comments:

Post a Comment