१. आई, ज्ञान दे ! विवेक दे ! वैराग्य दे !
वडिलांचा मृत्यू झाला. उत्पन्न थंडावले.सोयरे धायरे, पाहुणे रावळे यांनी आपापल्या घरची वाट पकडली. बुडणाऱ्या नावेतील उंदीर पटापट उडी मारून पसार होतात ना तसे.
नरेन्द्राच्या समोर प्रश्न उभ राहिला. आता करायचे काय ? नोकरीची खटपट चालू होती. नोकरी मिळायची पण कमी पगाराची. घरच्यांचा उदरनिर्वाह चालायचा कसा ?
कोणीतरी सांगितले. रामकृष्णांना विचार. ते कालीमातेबरोबर बोलून देतील तुला नोकरी. नरेंद्र गेला रामकृष्णाकडे .
' मला नोकरी दे. '
' अरे तूच जाऊन मातेकडून मागून घे ना ! '
नरेंद्र कालीमातेच्या गर्भगृहात गेला. डोळे झाकले. अभिवादन केले. समोर उभी होती साक्षात जगन्माता. त्रिभुवन धारिणी दुर्गा. " आई, ज्ञान दे ! विवेक दे ! वैराग्य दे ! "
नरेंद्र बाहेर आला. रामकृष्ण म्हणाले,' बेटा नोरेन, मागितलीस का संपत्ती ? '
नाही. विसरूनच गेलो. नरेंद्र म्हणाला.
' चल, पुन्हा माग.' रामकृष्ण उत्तरले.
पुन्हा येरे माझ्या मागल्या. रामकृष्ण हसले. नरेंद्राला म्हणाले, '' अरे वेड्या, तुझा जन्म संपत्ती मिळविण्यासाठी नाही झालाय. तो कशासाठी झालाय तेच आई वदलीय ! तुझ्याच तोंडून ! ''

No comments:
Post a Comment