Thursday, February 21, 2013

कथा विवेकानंद १९.

                       १९. मीच बोलत होतो.

     शाळेतील दोन तासिकांच्या मध्ये  बोलणे हे विद्यार्थ्यांच्या आवडीचे. शाळेतील त्याचा आनंद वेगळाच. उपक्रमी व उपद्रवी विद्यार्थी यांची तर हि हक्काची वेळ.
     तासिकेचे शिक्षक निघून गेले होते. नरेंद्र मित्रांशी एका विषयावर बोलायला लागला. तो बोलत असतानाच पुढच्या विषयाचे शिक्षक आले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. 
     काही वेळाने कोणीतरी बोलत असल्याचा संशय शिक्षकांना आला. त्यांनी मुलांना उभे केले. चालू विषयावर काही प्रश्न ते मुलांना विचारायला लागले. कोणालाही उत्तरे येईनात. सगळी मुले उभी राहिली. नरेंद्राची पाळी आली. त्याचे शिकविण्याकडे लक्ष होते. त्याने बरोबर उत्तर दिले. 
     उत्तर चूक आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना गुरुजी शिक्षा देऊ लागले. नरेन्द्रहि उभा राहिला. 
     ' मलाही शिक्षा द्या. ' तो म्हणाला.
     शिक्षकांनी विचारले, ' तुला कशाला ? तुझे तर शिकविण्याकडे लक्ष होते. '
     नरेंद्र म्हणाला, " गुरुजी हि मुले नव्हेत, खरा मीच बोलत होतो. " 

No comments:

Post a Comment