Tuesday, February 19, 2013

कथा विवेकानंद १७

                     १७. मी जादुगार आहे. 

     भारतावर तेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते. भारताला भेट देण्यासाठी एक ब्रिटीश युद्धनौका आली होती. लोकांना प्रवेशिका काढून ती पाहायला जायला मिळत असे. नरेंद्रच्या मित्रांनी युद्धनौका पहायला जायचे ठरविले.
     प्रवेशिका देण्याचे काम एक ब्रिटीश अधिकारी करीत असे. मुलांची टोळी त्या अधिकाऱ्याच्या बंगल्यावर गेली. दारात एक दरवान होता. तो कसाच मुलांना आत सोडेना. उलट हुज्जत घालू लागला. मुलांशी भांडू लागला. युद्ध्नौका प्रवेशासाठी छोटेसे युद्धच झाले म्हणा ना !
     इतक्यात हातात प्रवेशिका नाचवीत नरेंद्र बंगल्यातून बाहेर पडला. ' प्रवेशिका मिळाल्या. ' तो मित्रांना म्हणाला. दरवानाला समजेना कि हे कसे घडले ? तो नरेंद्राला विचारू लागला.
     नरेंद्र म्हणाला, ' त्यात काय ? मी जादुगार आहे.  मी जादुने प्रवेशिका घेऊन आलो. ' दरवान आ वासून पाहू लागला.
     पुढे गेल्यावर नरेंद्र मित्रांना म्हणाला, ' कसली जादू अन कसले काय ! दरवान तुमच्याशी भांडायला लागताच मी इकडे तिकडे पहिले. त्या बंगल्याला मागे आणखी एक दार असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्या दाराने आत गेलो आणि प्रवेशिका घेऊन आलो. "

No comments:

Post a Comment