१२. समयसूचकता !
नरेंद्र उत्साही युयुत्सु वृत्तीचा. अनेक उपक्रमात त्याचा सहभाग असे. तो रोज व्यायाम करायला जात असे. एके दिवशी सगळे मित्र जमा झाले. झोपाळा उभा करायचे काम करु लागले.
तिथून एक इंग्रज माणूस जात होता. लहान मुले काम करताना बघून तो मदत करायला म्हणून आला. खांब उभा करायचे काम चालले होते. काम करताना थोडी गडबड झाली आणि खांब कोसळला.
खांब कोसळला, तो नेमका त्या इंग्रज माणसाच्या डोक्यावर. त्याच्या डोक्याला जखम झाली.भळभळा रक्त वाहू लागले. सगळी मुले घाबरून गेली. भयभीत होऊन बघू लागली.
नरेंद्राने वेळ घालविला नाही. झटकन आपला सदरा फाडला. पट्टी काढली आणि त्या माणसाची जखम बांधली. रक्तस्त्राव थांबला. नरेंद्रने मित्रांकडून थोडे थोडे पैसे जमा केले आणि त्या माणसाला औषधोपचार करण्यासाठी दिले.

No comments:
Post a Comment