Wednesday, February 13, 2013

कथा विवेकानंद ५

                           ५. काहीही विचारा !

     स्वामी विवेकानंद आपल्या भारत भ्रमणात होते. मेरठला आले असताना योगायोगाने त्यांचे संन्यासी मित्र तिकडे पोहोचले. खूप दिवसांच्या भेटीने सगळ्यांना आनंद झाला. ते तिकडे राहू लागले.
     स्वामीजी त्या दिवसात ज्योन ल्युबक यांच्या वांग्मयाचे वाचन करीत होते. स्वामी अखंडानंद एकेक खंड आणून देत . स्वामीजी सहज तो खंड वाचीत व दुसरा आणायला सांगीत . वाचनालयाच्या प्रमुखांना आश्चर्य वाटे. एवढा जाडाजुडा ग्रंथ इतक्या कमी कालावधीत कसा वाचला जातोय ! 
     ' हा माणूस बहुधा सहकाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी हा उद्योग करीत आहे.' स्वामी अखंडानंद आले असताना ग्रंथपालाने आपली शंका बोलून दाखविली. अखंडानंद म्हणाले, ' तसे नव्हे. स्वामीजी पूर्ण ग्रंथ वाचतात. तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ शकता ! ' घडलेला प्रसंग अखंडानंदांनी स्वामीजींना सांगितला.स्वामीजी हसले.
     संध्याकाळची वेळ.स्वामीजी नवा ग्रंथ आणण्यासाठी स्वतः वाचनालयात गेले. स्वामीजी समोर दिसताच ग्रंथपाल म्हणाले, ' काहो, तुम्ही ग्रंथ चाळता कि नुसती पाने उघडता. एका दिवसात ग्रंथ संपतो, म्हणून विचारले.'
      स्वामीजी त्याला म्हणाले. " आपण कोणत्याही ग्रंथाचे कोणतेही पान उघडा आणि विचारा . आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. "
ग्रंथपाल प्रश्न विचारता झाला.स्वामीजी सांगते झाले.त्याचा आ कधी वसला त्यालाही कळले नाही.

No comments:

Post a Comment