Monday, February 25, 2013

कथा विवेकानंद २२

                  २२ . त्यांना परमेश्वर दिसतो . 

     नरेंद्र अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला होता . साहजिकच सगळ्या प्राध्यापकांना तो आवडत असे . 
     प्राचार्य विल्यम हेस्टी वर्गात विल्यम वर्डस्वर्थ यांची ' एक्स्कर्शन ' कविता शिकवीत होते . शिकविता शिकविता त्यात समाधी , ईश्वर असे शब्द आले . नरेंद्र एकदम उभा राहिला आणि म्हणाला , ' सर , तुम्ही ईश्वर पाहिला आहे काय ? '
     प्राचार्य नरेंद्राची बुद्धिमत्ता जाणून होते . ते म्हणाले , ' नाही . पण दक्षिणेश्वरी स्वामी रामकृष्ण परमहंस नावाचे संत राहतात . त्यांना परमेश्वर दिसतो , ते त्याच्याशी बोलतात असे म्हणतात . ' 
     नरेंद्रने दक्षिणेश्वरी जाण्याचा विचार पक्का केला . 

No comments:

Post a Comment