९. ब्रह्मराक्षस वगैरे कोणी नाही.
नरेंद्र मित्रांना घेऊन नेहमी एका बागेत जात असे. तेथील झाडांवर ती वानरसेना यथेच्छ खेळ खेळे, नाचे-बागडे. रात्र झाल्यावर दमून भागून घरी परते. तेथे असलेल्या माळ्याला ते आवडत नसे. काय करावे बरे ? माळ्याने थोडा विचार केला.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मुले खेळायला आली. खेळून दमल्यावर माळ्याने मुलांना जवळ बोलावले. गोड शब्दात तो म्हणाला, ' मुलांनो, ते झाड दिसतेय ना ? ज्याच्यावर तुम्ही रोज खेळताय ! त्या झाडावर एक भलामोठा ब्रह्मराक्षस राहतोय. उद्यापासून तुम्ही तेथे खेळू नका. '
माळ्याचे ते हावभाव बघून मुले भीतीने पळाली. माळी आपल्या युक्तीवर खुश झाला.
दुसऱ्या दिवशीचा प्रसंग. नरेंद्र मुलांना खेळायला बोलावू लागला. मुले यायला तयार होईनात. नरेंद्र म्हणाला, " अरे भिऊ नका.तेथे ब्रह्मराक्षस वगैरे कोणी नाही. त्या माळ्याने आपल्याला उगाच भीती दाखविली.
काल तुम्ही सगळे भिउन पळालात. मी काय केले ठाऊक आहे. मी त्या झाडावर जाऊन उलटा लटकलो, उड्या मारल्या, झोके घेतले. राक्षस कुठला, कोणीही आले नाही. आणि मला हे सांगा. जर राक्षस असता, तर त्याने आम्हाला इतके दिवस खाऊन टाकले नसते का ? चला खेळायला. पळा ! धूम ! "

No comments:
Post a Comment