८. प्राणीही चांगले वागतात !
छोट्या नोरेनच्या घरी अनेक प्राणी होते. त्यांच्याशी खेळणे त्याला खूप आवडे. गाईला हार घालून तिची पूजा करणे हा तर त्याचा आवडता छंद.
वडिलांनी आवडीने त्याला घोडा घेऊन दिला होता.
स्वामी विवेकानंद अमेरिकी शिष्यासमवेत हिमालयाच्या प्रवासात होते. शिष्य असाच एकदा घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करीत होता.घोडा त्याला पाडण्याचा यत्न करीत होता. स्वामीजी त्याच्या जवळ गेले. घोड्याला त्यांनी चुचकारले. त्याच्या पाठीवरून हात फिरविला. घोडा सरळ झाला. शहाण्यासारखा वागू लागला.
स्वामीजी म्हणाले, ' प्राण्यांना माणसाची भाषा कळते. तुम्ही त्याच्याशी चांगले वागलात,कि ते सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे वागतात. भिऊ नको आता तो काही करणार नाही. बस त्याच्यावर. '

No comments:
Post a Comment