Thursday, February 14, 2013

कथा विवेकानंद ७

                            ७.स्मरणशक्ती !

      स्वामी विवेकानंद यांचा मुक्काम बेलूर मठात होता. थोडे आजारी असल्यामुळे ते झोपून असत. वाचन करीत.त्या काळी एन्सय्क्लोपिडिया ऑफ ब्रिटानिका हा ज्ञानकोश प्रसिद्ध झाला होता. त्याचे ते खंड बेलूर मठात आणले होते. 
     आजारपणात स्वामीजींचा शिष्य शरद त्यांची सेवा करी. एकदा स्वामीजी ग्रंथ वाचीत असताना शरद म्हणाला, ' स्वामीजी हे ग्रंथ वाचायचे म्हणजे आख्खा जन्म पाहिजे बुवा! '
     स्वामीजी म्हणाले, ' कुठे काय ? मी तर हे दहाही खंड केव्हाच वाचून संपविलेत. '
     शरदला आश्चर्य वाटले. अविश्वासही वाटला. स्वामीजींची परीक्षा घेण्याचे त्याने ठरविले. त्यातील एक जाडजूड खंड काढून त्याने चाळला. कठीणातील कठीण प्रश्न तो स्वामीजींना विचारू लागला. विवेकानंद त्या  प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. विषयाचे स्पष्टीकरण करू लागले. काही उतारे तर त्यांनी धडाधड म्हणूनही  दाखविले.
     शरद चकित झाला होता. 

No comments:

Post a Comment