Wednesday, February 13, 2013

कथा विवेकानंद ६

                             ६. एकाग्रता 

     स्वामी विवेकानंद अमेरिकेत होते. असेच फिरता फिरता ते एका तळ्याकाठी आले. तेथे काही मुले नेमबाजीचा खेळ खेळत होती. तळ्यात अंड्यांची टरफले टाकली होती व बंदुकीने त्यावर गोळी झाडत होती. पण एकही गोळी अंड्यांना लागत नव्हती.
     त्या मुलांचा खेळ बघून स्वामीजी हसले. मुलांना म्हणाले, ' अरे,एकाग्रपणे नेम धरा . गोळी अचूक लागेल.'
     ' तुम्ही माराल का ? ' एक उध्दट पोरगा म्हणाला.
     स्वामीजींनी बंदूक हातात घेतली. नेम धरला आणि गोळी झाडली. टरफलाचे दोन तुकडे झाले होते. स्वामीजी गोळ्या झाडीत होते, टरफलाचे तुकडे होत होते.
     " तुम्ही कोणत्या रायफल संघाचे सभासद आहात ? " मुलांनी प्रश्न केला.
     स्वामीजी म्हणाले, " अरे, आज मी बंदूक पहिल्यांदाच हातात धरली आहे. "
     तोंडात बोटे घालून ती मुले स्वामी विवेकानंदांना बघत होती.

No comments:

Post a Comment