Sunday, February 17, 2013

कथा विवेकानंद १३

                   १३. घोडागाडी नियंत्रणात !

     विद्यार्थी दशा हि शिकण्याची, नवनवीन ज्ञान घेण्याची आयु. नरेंद्राचा बहुयामी स्वभाव बघून वडिलांनी त्याला घोडा घेऊन दिला. घोड्यावर बसणे तो लवकरच शिकला. घोड्यावर बसून मोठ्या ऐटीत फिरणे त्याला खूप आवडे.
     एकदा नरेंद्र बाजारात गेला होता. समोरून एक घोडागाडी भरधाव वेगात येत होती. गाडीचा घोडा उधळला होता. वाट फुटेल तसा तो धावत सुटला होता. त्या गाडीत एक स्त्री होती. तिची भीतीने गाळण उडाली होती. धावा धावा,वाचवा वाचवा, अशी ती लोकांना विनंती करीत होती. पण त्या उधळलेल्या घोड्याला पाहून कोणाचीच पुढे जाण्याची हिम्मत होत नव्हती.
     नरेंद्रने क्षणर्धात परिस्थिती ओळखली.  तो त्या गाडीच्या दिशेने झेपावला. आपली तीक्ष्ण नजर घोड्यावर रोखीत त्याने गाडीत उडी ठोकली. घोड्याचे लगाम खेचीत घोड्याला नियंत्रणात आणले. घोड्याला चुचकारत, वेग कमी करीत गाडी थांबविली. त्या महिलेच्या जीवात जीव आला होता. कृतज्ञतेचे अश्रूं डोळ्यात उभे राहिले होते.

No comments:

Post a Comment