४. अविचल निश्चल !
स्वामी विवेकानंद अमेरिकेत असतानाचा प्रसंग. अमेरिकी प्रत्येक गोष्ट पडताळून बघणारे.साहजिकच त्यांनी स्वामीजींची परीक्षा घ्यायचे ठरविले.
आपल्या गावात त्यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठरविले. तयारी केली, निमंत्रणे दिली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरु झाला. स्वामीजींची वेळ झाली आणि ते बोलायला उभे राहिले. आपल्या चिरपरिचित धीरगंभीर आवाजात ते बोलू लागले. आपला विषय मांडू लागले.
आयोजक तरुणापैकी काही जण दूरवर उभे होते. त्यांनी बंदूक उचलली आणि स्वामीजींच्या दिशेने एक गोळी झाडली. ठोः असा आवाज झाला. गोळी सणसणत स्वामीजींच्या कानाजवळून निघून गेली. क्षणभरात दुसरी गोळी आली. स्वामीजींचे बोलणे सुरूच होते.
दूरवर थांबलेले ते तरुण स्वामीजी जवळ आले. अभिवादन करीत ते पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागले. ते तरुण म्हणाले, '' स्वामीजी, आम्ही तुमची परीक्षा घेत होतो. शांत-अशांत, स्थिर-अस्थिर कोणत्याही परीस्थितीत साधू अविचल असतो. असे तुम्ही सांगत होतात. असे सांगणारे तुम्ही, स्वतः तसे आहात का ? हे आम्ही बघितले. ''
' बोले तैसे चाले,त्याची वंदावी पाऊले ' आम्ही तुम्हाला वंदन करतो.

No comments:
Post a Comment