१०. मी मारुतीची वाट बघतोय !
देवळात कीर्तन होते. आई भुवनेश्वरी नोरेनला घेऊन कीर्तनाला आली होती. निरुपण चालू असताना मारुतीचा विषय आला. कथेकरी बुवा म्हणाले, ' मारुती हा सात चिरंजीव महापुरुषापैकी एक आहे. हे सातही महापुरुष आज जिवंत आहेत. '
नोरेंनचे डोळे विस्फारले. तो कीर्तनकार बुवांना म्हणाला, ' बुवा, मला मारुतीला बघता येईल काय ? '
वेळ निभाऊन नेण्यासाठी बुवा म्हणाले,' हो. मारुतीला केळी खूप आवडतात. तो नेहमी केळीच्या बागेत येत असतो. '
दुसऱ्या दिवशी नरेंद्रच्या खोड्या नाहीत, गडबड नाही, तो दिसतही नाही म्हणून आई त्याला शोधायला लागली. बघतेय तर तो केळीच्या बागेत बसलाय. " अरे, इथे काय करतोय ? आणि गप्प का ? " आई म्हणाली.
नरेन्द्र म्हणाला, ' आई, काल बुवांनी सांगितलेय ना ! मारुतीला केळी खूप आवडतात. तो केळीच्या बागेत येतो. त्याची वाट पाहत मी बसलोय ! तो कधी येईल ग ! '
आई म्हणाली, '' अरे वेड्या तो रामाचा भक्त ना ? रामरायाने त्याला दुसरे कोणते काम सांगितले असेल. तो दुसरीकडे गेला असेल ! आपण नंतर कधी तरी येऊया हं त्याला भेटायला ! चल आता ! ''

No comments:
Post a Comment