१८. परमेश्वर एकच
स्वामीजींचा मुक्काम महाराजांकडे होता. महाराजांनी नर्तिकेच्या नृत्याचे आयोजन केले होते. साहजिकच स्वामीजींना आमंत्रण मिळाले. पण स्वामीजी म्हणाले, ' मी संन्याशी. मला कसले नाच अन गाणे. मी येणार नाही.'
कसे काय झाले कळले नाही. हि गोष्ट त्या नर्तिकेच्या कानावर गेली. तिला वाईट वाटले. नर्तिका हुशार होती. त्या दिवशी तिने सुरदासाचे भजन लावले. ' व्यक्ती, वस्तू कोणतीही असो. त्यामधला परमेश्वर एकच असतो ना ! असा त्या भजनाचा भावार्थ होता. ' अगदी तन्मय होऊन ती गात होती. भजन आळवीत होती.
स्वामीजींना भजनाचा, गायचा मतितार्थ समजला. ते उठले. गायन स्थानी ते गेले. पूर्ण मैफल त्यांनी ऐकली. थोडा उरला सुरला भेदही नष्ट झाला होता.

No comments:
Post a Comment