१५.वेगवेगळे हुक्के कशासाठी ?
नरेंद्र बालपणापासून चिकित्सक वृत्तीचा. प्रत्येक गोष्ट तो अनुभवून पाही. सारासार विवेकबुद्धीच्या कसोटीवर तपासून पाही.
विश्वनाथ दत्त नामांकित वकील होते. साहजिकच अनेक जातीची अशिले त्यांच्याकडे येत. त्या काळी जाती पाळल्या जात असत. त्यामुळे आतिथ्य पाहुणचारासाठी जातीनुसार अनेक हुक्के त्यांच्या घरी असत. दिवाणखान्यात आलेला आपापल्या जातीनुसार हुक्क्याचा वापर करीत असे.
एके दिवशी विश्वनाथ बाबूंनी बघितले कि, नरेंद्र खुर्चीवर बसलाय आणि एकेक हुक्का ओढून पहातोय. वडिलांनी विचारले, ' बेटा हे काय करतोय ? '
नरेंद्र म्हणाला, " बाबा आमच्या घरी येणारी माणसे तर सगळी सारखी. एकाच रंगाच्या रक्ताची. आणि मग एकच प्रकारच्या, सारख्या, समान माणसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हुक्के कशासाठी ? "

No comments:
Post a Comment