११. जीव वाचविल्याचे समाधान !
शेजारच्या गावी जत्रा होती. बाल नरेंद्र जत्रेला गेला होता. कोणी खाऊ घेत होते. कोणी खेळणी घेत होते. नरेंद्र मात्र एका मूर्तींच्या दुकानाबाहेर घोटाळत होता. शंकराची एक सुंदर मूर्ती त्याला खूप आवडली होती. शेवटी ती मूर्ती त्याने विकत घेतली.
शंकराच्या त्या छान मूर्तीकडे पाहत तिच्या पूजेचा, सजावटीचा विचार तो करू लागला. इतक्यात त्याचे लक्ष रस्त्यावर गेले. एक छोटे मूल रांगत रांगत रस्त्यात मध्ये आले होते. आणि समोरून घोडागाडी भरधाव वेगाने येत होती. थोडा वेळ गेला कि ते मूल चाकांखाली किंवा घोड्यांच्या टापाखाली आले असते.
नरेंद्रने वेळ केला नाही. झटक्यात आपल्या हातातली मूर्ती त्याने खाली ठेवली. तीरासारखा मुलाच्या दिशेने झेपावला. क्षणार्धात त्या मुलाला त्याने बाजूला काढले. घोडागाडी निघून गेली होती.
नरेंद्र आपल्या मूर्ती जवळ आला. मूर्तीचे तुकडे झाले होते. तो त्या तुकड्यांना बघत होता. एका डोळ्यात मूर्ती तुटल्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यात जीव वाचविल्याचे समाधान !

No comments:
Post a Comment