कथा विवेकानंद - ९३
सौ. इंदुमती आणि श्री. हरिपद मित्र अनुरूप हिंदू दांपत्य . गृहस्थी जीवन व्यतीत करतानाही आध्यात्मिकतेचा भाव मनी बाळगणारे . सौ . इंदुमतीच्या मनात गुरुमंत्र घ्यायची इच्छा होती . हरिपदांना आपली इच्छा तिने एकदा बोलून दाखविली होती . योग्य गुरु मिळाला तर आपण दोघेही दीक्षा घेऊ असे हरीपदांनी सांगितले होते .
स्वामीजींची भेट झाली . ते निवासाला घरी आले . त्यांचे जवळून दर्शन झाल्यावर दोघांच्याही इच्छांना गरुडाचे पंख फुटले . हरीपदांनी इंदुमतीला विचारले, ' स्वामीकडून दीक्षा घ्यायची काय ? ' तिने लगेच होकार दिला .
स्वामिजींशी बोलता बोलता हरिपदांनी विषय काढला . स्वामीजी म्हणाले, ' गुरु होणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे . कारण गुरूला शिष्याचा सर्व भार सहन करावा लागतो . शिवाय दीक्षा देणारा गुरु आणि घेणारा शिष्य यांच्या किमान तीन भेटी त्यापूर्वी घडून आल्या पाहिजेत . आणि एक संकेत आपण बाळगला पाहिजे . तो म्हणजे संसारी माणसांनी संसारी गुरू करावा हे चांगले . '
मित्र दांपत्याने हट्टच धरला आणि स्वामीजींनी त्यांना दीक्षा दिली .

No comments:
Post a Comment