कथा विवेकानंद - ८८
बेळगावच्या सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचा मुक्काम होता . प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या भासणाऱ्या या संन्याशाने भाटे वकिलांचे कुतूहल जागृत केले . इकडे तिकडे अशी स्वामीजींची थोडी चाचपणी करताच त्यांच्या लक्षात आले की हे पाणी थोडे वेगळे आहे . ते बुद्धिमानच नव्हे तर जिनियस आहेत .
थोडे अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला . त्यांनी आपल्या मित्रांना पेयपानासाठी निमंत्रण दिले . स्वामींनी मित्रांना जिंकले . वकिलांनी विद्वानांना तसेच पुढाऱ्यांना बोलाविले . सगळ्यांनी एकमुखाने निर्वाळा दिला, ' केवळ, या सम हा ! '
धार्मिक विषयावरील वादविवादाचा समारोप त्यांनी केला, ' हिंदू धर्म मृत्युपंथाला लागलेला नाही . आज जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची गरज आहे . वेदांत हा नुसता संप्रदाय नाही . जगाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या विचारात आहे . '

No comments:
Post a Comment