कथा विवेकानंद - ८०
स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करीत होते . प्रवासात बंगळुरुला त्यांनी डॉ. पन्यू यांच्याकडे मुक्काम केला . डॉ पन्यू सरकारी वैद्यकीय अधिकारी होते . बोलत असताना त्यांनी आपल्या मनातील वेदना स्वामीजींना बोलून दाखविली .
ते म्हणाले, ' त्रावणकोरमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व आहे . त्यामुळे डॉक्टरी पास करूनह मला नोकरी मिळाली नाही . ब्राह्मणांना प्रसन्न करण्याचा मार्ग कोणता ? '
स्वामीजी डॉक्टरांना म्हणाले, ' तुम्ही कशाला ब्राह्मणांच्या नादाला लागता ? तुमच्या समाजातही चांगली, सत्चरित्र माणसे असतील ! त्यातील गुणी माणसाला पुढारी बनवा आणि पुढे चला . '
डॉ. पन्यूनी स्वामीजींचा सल्ला मानला . त्यांना श्री. नारायण गुरु यांच्या मध्ये नेतेपदाचे गुण आढळले . श्री. नारायण गुरूंना त्यांनी गुरुपदी बसविले . त्यांची सगळी जात नारायण गुरूंना आदर्श मानू लागली . त्यांचा आदेश पाळू लागली . श्री. नारायण गुरु हळूहळू मग साऱ्या समाजाचेच नेते बनले, प्रातःस्मरणीय झाले .

No comments:
Post a Comment