कथा विवेकानंद - ७७
स्वामी विवेकानंदांना सिन्हा नावाचे एक सदगृहस्थ भेटायला आले होते . हिंदू धर्मावर चर्चा चालली होती . चर्चा करताना स्वामीनी त्यांना अमेरिका प्रवासा दरम्यान घडलेले काही प्रसंग सांगितले . हिंदू धर्मावर टीका करताना ख्रिस्ती मिशनरी केवढ्या खालच्या पातळीवर येतात त्याचे वर्णन केले आणि विचारले, ' मला एक सांग . तुझ्या आईचा कोणी अपमान केला तर तू गप्प बसशील काय ? '
सिन्हा म्हणाले, ' अजिबात नाही . उलट मी त्याला यथेच्छ बदडून काढीन . '
' एकदम बरोबर ! ' स्वामीजी म्हणाले . ' आता मला एक सांग . असाच भाव तुझ्या मनात आपल्या हिंदू समाजाविषयी असता तर ? आपल्या भावांचे हे जे ख्रिस्तीकरण चालू आहे ते बघून तू शांत राहिला असता काय ? हिंदूंना बाटविणे मिशनरयाना शक्य झाले असते काय ? चौकाचौकात उभे राहून ते आपल्या धर्माला शिव्या देऊ शकले असते काय ? '

No comments:
Post a Comment