कथा विवेकानंद - ८६
स्वामीजीचा मुक्काम चेन्नईमध्ये होता . एका निवांत क्षणी स्वामीजींनी गायला सुरुवात केली . ' इंद्र जिमी जंभ पर वाड वसु अम्भ पर रावन सदंभ पर रघुकुल राज है ' स्वामीजी तल्लीन होऊन गात होते .
एका शिष्याला हे गाणे आवडले नाही . तो स्वामीजींना म्हणाला, ' स्वामीजी, तुम्ही एका दरोडेखोराची स्तुती करता ? ज्या माणसाने रक्ताचे पाट वाहविले, शहरे लुटली, धन्याशी फितुरी केली, अत्याचार केले त्याची तुम्ही भलावण करता ? शिवाजी हा वाटमारी करणारा एक दरोडेखोर आहे . '
स्वामीजीनी गाणे तत्काळ थांबविले . रागाने लालबुंद झाले ते . तीव्र शब्दात ते त्या शिष्याला म्हणले, ' काय बोलतोस तू ? आणि कोणाबद्धल ?
लाज वाटते मला तुझी ! या देशात अंधःकार पसरला होता . समाजाचे अधःपतन झाले होते . धर्म आणि संस्कृती विनाशाच्या दिशेने वेगाने चालली होती . सगळेच आपले कर्तव्य विसरले होते अशा निराशेच्या तिमिरात उगवलेला हा सूर्य आहे सूर्य !
आणि मला तुमची मजा वाटते . शिकलेला इतिहास तुम्ही जशाचा तसा खरा मानता . हा इतिहास परक्यांनी लिहिलेला आहे . आक्रमकांनी लिहिलेला आहे . सत्य हे आहे की, भारतीय ऋषी मुनी दास्यमुक्तीसाठी ज्या महापुरुषाची अनेक वर्षे वाट पाहत होते ते आहेत हे शिवराय .
आधुनिक ऋषी नवा शिववेद सांगत होता .

No comments:
Post a Comment