कथा विवेकानंद - ७२
स्वामी विवेकानंद गोव्यात आले . मडगावात श्री . सुब्राय नायक यांच्या घरात, सालात त्यांचा मुक्काम होता. स्वामीजींची गायन वादनाची आवड सुब्रायबाबांनी हेरली .
पर्वतावर याच काळात लयसूर्याचा उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक अनोखा चमत्कार ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल
धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर . सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले.
स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी
सांगताना स्वामीजी म्हणाले, '
लाकडी खोक्याच्या कडेवर
बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा
आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. ' खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही.
स्वामीजी
आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना
आ वासायला लावणारा तालवेडा कलावंत खाप्रू . आज त्याचा वासलेला आ पहाण्याचे भाग्य सर्वाना मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना
साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या उमेदीच्या, उभारीच्या अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी साक्षात वादन देवतेशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू
मामांना लाभले, ते कीर्तिवंत झाले .
No comments:
Post a Comment