कथा विवेकानंद - ९ ०
भाटे वकिलांच्या घरी सगळे जमले होते . बेळगावातील त्या प्रतिष्ठित आणि विद्वान व्यक्तींशी स्वामीजी संवाद साधत होते . कोणी हिंदी भाषेत,कोणी संस्कृत भाषेत तर बहुतेकजण इंग्रजी भाषेत आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते . स्वामिजीही कधी विनोदाने कधी थट्टेने तर कधी गंभीरपणे उपस्थित प्रश्नांची उत्तरे देत होते .
एकाने संस्कृत मध्ये प्रश्न विचारला, ' अमुक पुराणात सांगितले आहे की, म्लेंछ भाषेत धर्माची चर्चा करणे निषिद्ध आहे . ' स्वामीजींचे डोळे क्षणभर चमकले . ते म्हणाले, ' धर्मचर्चा करायला भाषेचे बंधन नाही . तुम्ही कोणत्याही भाषेतून धर्मचर्चा करू शकता . '
वेदादिकातील अनेक दाखले देत ते पुढे म्हणाले, ' आपल्याला ठाऊक असेलच की पुराणांपेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ आहे . हायकोर्टाचा निकाल खालची न्यायालये नाकारू शकत नाहीत . '

No comments:
Post a Comment