कथा विवेकानंद - ६९
स्वामी विवेकानंद थोर गायक व श्रेष्ठ वादक होते . हा वसा त्यांचे आजोबा दुर्गाप्रसाद व वडील विश्वनाथदत्त यांच्याकडून मिळाला होता . भरदार आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना घराण्याकडून लाभली होती .
स्वामी रामकृष्ण आपल्या शिष्यांसह गाणे ऐकायला बसले होते . त्या दैवी आवाजसागरात आता मनसोक्त विहार करायचा . सगळे उत्सुक होते . विवेकानंदांनी तानपुरा जुळवायला सुरुवात केली . पाच मिनिटे झाली दहा मिनिटे झाली तानपुरा काही जुळेना .
शिष्य चुळबुळायला लागले . रामकृष्णही पाचपाच मिनिटांनी त्याला सुरु करायचा आग्रह करायला लागले . पण तो जाम सुरु करेना . आधी तानपुरा जुळणी मगच गायन ! बराच वेळ झाला . सगळेच कंटाळले . विनंत्या, मिनतवाऱ्या कशाचाही परिणाम होईना . शेवटी स्वामी रामकृष्ण परमहंस उठले .
शिष्यांना म्हणाले, ' चला, उठा आता ! आजचा दिवस तानपुऱ्याचा, गाणे उद्या होईल . मी आणि थोडा वेळ जर इथे थांबलो ना तर तो तानपुरा निश्चितच जमिनीवर आपटून फोडून टाकीन . '

No comments:
Post a Comment