कथा विवेकानंद - ८४
स्वामी विवेकानंद रेल्वेने मुंबईहून पुण्याला निघाले . त्याच डब्यातून लोकमान्य टिळकही आपल्या चारपाच मित्रांसह आपल्या घरी पुण्याला चालले होते . मुंबईच्या शेठ रामदास छबिलदास यांनी तशी स्वामीजी व टिळक यांची एकमेकांशी ओळख करून दिली होती . आपण एक संन्याशी एवढेच स्वामीजींनी सांगितले होते .
स्वामीजी खिडकीतून दिसणारा निसर्ग न्याहाळीत होते . व्यष्टी हा समष्टीचाच भाग असल्याने देशाटनात त्याचेही निरीक्षण आलेच . टिळकांचे मित्र विविध विषयावर चर्चा करीत होते . आपापले मत हिरीरीने नोंदत होते .
विषय संन्याशी या विषयावर घसरला . दोघेजण तर हळूहळू संन्याशांची टिंगल टवाळी इतपत खाली उतरले . स्वामीजींचे लक्ष त्या चर्चेकडे गेले . ते दोघेही साधूंना भोंदू , ऐतखाऊ, भिकारी, देशाची चिंता नसणारे अशी दुषणे देऊ लागले .
टिळक संन्याशांची बाजू मांडू लागले . पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . शेवटी स्वामीजींनी चर्चेत भाग घेतला . इंग्रजी भाषेत अस्खलितपणे आणि मुद्देसूद आक्रमक संवादाने स्वामीजींनी त्या महाभागांना निरुत्तर केले . एका संन्याशाची भाषा, वक्तृत्व, वादपटुत्व पाहताना सगळे थक्क झाले होते . डोळे विस्फारून बघत होते .

No comments:
Post a Comment