कथा विवेकानंद - ११५
वडिलांच्या देहावसानानंतर नरेंद्रच्या घरची परिस्थिती बिकट झाली . खायची जेवायचीच मारामार . मग कपडेलत्ते आणि कुठे ? भुवनेश्वरीदेवी नित्य आन्हिक करीत . आन्हिक करताना नेसायचे सोवळे फाटले होते .
डोके दुखत असल्याने नरेंद्र कापराचे नस्य घेत होता . आई त्याला म्हणाल्या, ' बेटा नोरेन, एखादे वस्त्र आणता आले तर बघ ना ! माझे सोवळे पूर्ण फाटलेय आता . ' नवे कुठून आणणार ? नरेंद्राला वाईट वाटले . तो मान खाली घालून निघून गेला .
नरेंद्र आश्रमात आला होता . त्याच वेळी रामकृष्णांना एका भक्ताने रेशमी सोवळे भेट म्हणून दिले होते . नरेंद्र दिसताच त्यांनी ते सोवळे नरेंद्राला न्यायला सांगितले . पण नरेंद्रने ते घेतले नाही .
मग रामकृष्णांनी दुसऱ्याच शिष्यामार्फत ते सोवळे नरेंद्रच्या घरी पाठविले .